पत्रकार दिनानिमित्त बालचम्मूंनी घेतली पत्रकारांचीच मुलाखत, नीरा नजिक थोपटेवाडीमधील असेंड स्कूलचा उपक्रम

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन ( मोहंंम्मदगौस आतार) –  पत्रकार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी यांची मुलाखत घेऊन व त्यांना विविध प्रश्न विचारून अनुत्तरित करीत असतात. परंतु सोमवारी (दि. ४) पत्रकारांनाच बालचम्मूंच्या मुलाखत, प्रतिक्रिया, चर्चा सत्राला सामोरे जावे लागले. निमित्त होतं पत्रकार दिनाचं. नीरानजीक थोपटेवाडी येथील असेंड इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थी व शिक्षकांनी पत्रकाराची भुमिका साकारून वेगळा आनंद घेतला.

नीरा नजीक थोपटेवाडी (ता.पुरंदर) येथील असेंड स्कूल मध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व मराठी पत्रकार दिनानिमित्त सोमवारी (दि. ६) स्थानिक पत्रकारांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी असेंड इंटरनँशनल स्कूलमध्ये पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांना विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडियाप्रमाणे एखाद्या विषयावर विविध प्रश्न विचारतात त्या भूमिकेत प्रश्न विचारले, तर काही विध्यार्थ्यानी स्वतः पत्रकार बनून बातमी तयार केली होती. स्कूलचे शिक्षक स्वप्निल पवार यांनी पत्रकारांची मुलाखत घेऊन व विविध प्रश्नासंदर्भात चर्चा सत्र भरविले. या चर्चासत्रात जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ननवरे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, भरत निगडे, मोहंम्मदगौस आतार, श्रद्धा जोशी हे पत्रकार सहभागी होते. पत्रकारांची मुलाखत घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी बाळासाहेब ननवरे, तनुजा शहा, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सोमनाथ खोमणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुदर्शन जैन, सचिव नीता खोमणे, संचालिका तनुजा शहा, नेहा शहा, मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव, उपमुख्याध्यापिका सुषमा भुंजे, पर्यवेक्षक विठ्ठल झगडे, सुनिता पवार, जस्मिन बागवान, जस्मिन सय्यद यांच्यासह स्कुलमधील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन साजिद शेख यांनी केले तर आभार स्वप्निल पवार यांनी मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/