मिरवणूक शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे : SDPU सुरेश पाटील

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – गणेश उत्सवाची सांगता विसर्जन मिरवणूकीने होत असुन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवावे, इतरांना त्याचा त्रास होणार नाही, वैयक्तिक वाद निघणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणूक शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील यांनी पंचायत समिती सभागृहात आयोजित शांतता समिती सदस्य गणेश मंडळ, पदाधिकारी व पोलीस पाटील यांच्या बैठकीत केले.

या बैठकीत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, नायब तहसीलदार रविराज जाधव, कळंब बस आगार व्यवस्थापक सुरेंद्र हौसलमल, एमईसईबि, ज्युनियर इंजिनिअर वैभव गायकवाड, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक दिपक हारकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी मिरवणूक मार्ग, तसेच वाहतुक पर्यायी मार्ग व्यवस्था गणेश मुर्ती विसर्जनासाठी कळंब नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळील जुन्या जलशुद्धीकरण केंद्र हौद येथे केलेली व्यवस्था मिरवणूक मार्गातील विद्युत तारांची उंची या विषयीच्या उपाययोजना करण्याविषयी संबंधीत कार्यालयांना सुचना केल्या. तर नायब तहसीलदार रविराज जाधव यांनी पोलिस पाटील प्रशासनाचे कान व डोळे आहेत त्यांनी सतर्क राहावे गणेश मंडळाने समाजप्रबोधनपर देखावे वृक्षारोपण, पुरग्रस्तासाठी मदत याविषयी कार्य केल्याचे सांगितले.

या बैठकीत प्रस्ताविक सहायक पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केले. सुत्रसंचालन परमेश्वर पालकर यांनी तर आभार प्रदर्शन हेडकॉन्स्टेबल तांबडे यांनी मानले. बैठकीत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भडंगे, महादेव महाराज आडसुळ, विलास मिटकरी, माधवसिंग राजपुत, ज्योती सपाटे, अॅड मनोज चोंदे व विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

आरोग्यनामा ऑनलाइन –

You might also like