‘दबंग’ नगरसेवक पिस्तुलसह महापालिकेच्या महासभेत

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत काही नगरसेवक पिस्तुल घेऊन बसतात असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केला. कोणत्या नियमानुसार हे सदस्य महासभेच्या सभागृहात पिस्तुल घेऊन येतात, अशी विचारणा त्यांनी महापालिका सचिव संजय जाधव यांच्याकडे केली.

कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडून आलेल्या बहुसंख्य नगरसेवकांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण दाखवून पिस्तुल बाळगण्याची परवानगी मिळविली आहे. या भागातील जमीन व्यवहार, त्यातील देवाणघेवाणीतील नगरसेवकांचा सहभाग, त्यातून होणाऱ्या गंभीर घटना यामुळे काही नगरसेवक कायम चर्चेत असतात. विविध पक्षांचे दबंग नगरसेवक महासभेला त्यांचे समर्थक व बॉडीगार्ड घेऊन महापालिकेत येतात. त्यांनाही महासभेच्या प्रेक्षा गॅलरीत प्रवेश दिला जातो.

पिस्तूल घेऊन सभेला हजर राहणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात महापालिका कारवाई का करत नाही, असा सवाल करत महासभेत एखाद्याला गोळी लागू शकते, अशी भीती म्हात्रे यांनी उपस्थित केली आहे.

महासभेत अनेक कारणांवरून यापूर्वी गदारोळ झालेले आहेत. तसेच सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन झटापटीचे प्रसंगही उद्भवलेले आहेत. तसेच त्यांचे समर्थकही महापालिका आवाराबाहेर भिडलेले आहेत.

पोलिसांनी अनेकदा सदस्य व त्यांच्या समर्थकांच्या गाड्या चेक केलेल्या आहेत. जीवित सुरक्षिततेसाठी काही सदस्यांकडे अग्निशस्त्र आहेत. त्यांनी ते महासभेत न नेता महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ जमा करावे, असे आदेश प्रशासनाने काढलेले आहेत. त्याची अंमलबजावणीच केली जात नसल्याचा मुद्दा म्हात्रे यांनी यानिमित्ताने पुन्हा उपस्थित केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

Loading...
You might also like