कल्याण-मुरबाड-नगर रस्त्याचे काम रखडल्याने अपघातात वाढ, शेकडो तरूणांचा घेतला जीव

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण आयोजित लोकदरबार या उपक्रमाअंतर्गत गांधी भवन मुंबई येथे महाराष्ट्राच्या विविध भागातील नागरिक आपआपल्या अडचणी घेवुन त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी काॅंग्रेस पक्षाचे जिल्हासरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी शिष्टमंडळासह सदरच्या उपक्रमात कल्याण-मुरबाड-नगर रस्त्याचे चौपदरीकरण करावे अशा आशयाचे निवेदन दिले.

मागील २-३ वर्षापासुन मुरबाड तालुक्यांतील अनेक तरुणांना आपला जीव अपघातामध्ये गमावावा लागला आहे. त्यामुळे सरदच्या महामार्गाचे रुंदीकरणाचा प्रस्ताव तात्काळ मंजुर करून काम सुरू करावे. मुरबाड-कल्याण ग्रामीण चा उपेक्षित राहीलेल्या भागाचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली.

सदरच्या मागणीबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक असुन योग्य कार्यवाही करण्यात येईल असे, यावेळी मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.

मागील काही दशकापासून कल्याण-मुरबाड-नगर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव प्रलंबित असुन लवकरात लवकर सदरील प्रस्ताव मंजुर करुन घेवुन नगरपर्यंत शक्य नसल्यास मौजे टोकावडे पर्यंत चौपदरीकरण करावे, जेणेकरुन अरुंद रस्त्यापायी होणारे शेकडो अपघात व त्यातुन जाणारे शेकडो जीव वाचावेत अशी मागणी केल्याचे यावेळी चेतनसिंह पवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष संजय शेलार, जेष्ठ नेते जयवंत पवार, सुनिल पानमंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like