‘आता कशाला कुणाची भीती, पाठीशी आहे महायुती’ ; कांचन कुल

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती मतदार संघातील लोकभेच्या महायुतीच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांची दौंड शहरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेमध्ये कांचन कुल यांनी “आता कशाला कुणाची भीती पाठीशी आहे महायुती” अशी कविता करून रामदास आठवले यांची आठवण करून दिली दौंड शहरातील मतदारांनी देखील त्यांच्या कवितेला टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत स्वीकारले.

पुढे कांचन कुल या म्हणाल्या, आमदार राहुल कुल यांचे कार्य दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. म्हणूनच मला महायुतीची उमेदवारी देण्यात आली अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मी प्रचारासाठी मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात फिरत असताना निस्वार्थीपणाने लोक माझ्यासोबत येत आहे. त्याचे कारण म्हणजे राहुल कुल यांनी आरोग्य विषयी केलेली कामे आहेत.

२०१३ मध्ये दौंड तालुक्याची दुरावस्था झाली होती. दौंड जवळ आले की खड्ड्यातील रस्ते सुरू होयचे पण २०१४ मध्ये राहुल कुल हे आमदार म्हणून निवडून आले आणि दौंडचा कायापालट झाला आहे. म्हणून मला एक संधी मिळावी म्हणजे मी देखील चांगले काम करेल अशी अपेक्षा कांचन कुल यांनी व्यक्त केली.

पुढे भाषणाच्या शेवटी कविता केली “तुम्ही मला खासदार करून पाठवा दिल्लीत, विकास कामांची गंगा आणेल गल्लीगल्लीत” अशी कविता करून भाषणाचा शेवट केला.

या सभेला दौंडच्या नगराध्यक्ष शीतल कटारिया, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, किसान युवा मोर्चाचे उपाध्यक्ष वासुदेव नाना काळे, आरपीआयचे प्रकाश भालेराव, शिवसेनेचे अनिल सोनवणे व नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading...
You might also like