बेरोजगार कन्हैया कुमारची ‘एवढी’ संपत्ती

बिहार : वृत्तसंस्था – जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय उमेदवार कन्हैया कुमार हा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बेगुसराय या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्याने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याने आपल्या अर्जासोबाबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्ती विषयी माहिती दिली आहे. त्याच्याकडे साधारण ८.५ लाखांची संपत्ती आहे.

बेरोजगार कन्हैया कुमारचे उत्पन्न किती ?

२०१८-१९ मध्ये त्याचे एकूण उत्पन्न २ लाख २८ हजार २९० रुपये इतके होते. तर २०१७- १८ या वर्षात त्याचे उत्पन्न ६लाख ३० हजार ३६० रुपये दाखवले आहे.

कन्हैयाने निवडणूक आयोगाकडे जाहीर केलेल्या संपत्तीनुसार त्याच्याकडे २४ हजाराची कॅश आहे. त्याच्या एका बॅंक खात्यात १ लाख ६३ हजार ६४८ रुपये आणि दुसऱ्या खात्यात ५० हजार रुपये जमा आहे. त्याशिवाय एक लाख ७० हजार एकशे पन्नास रुपयांची सेविंग आहे पण ह्यांनी स्वतः बेरोजगार दाखवले असून पुस्तके आणि विविध ठिकाणी घेतलेल्या व्याख्यानांची रॉयल्टी हे उत्पन्नाचे साधन असल्याचे म्हटले आहे. आपल्यावर पाच गुन्हे दाखल असल्याचाही उल्लेख त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष असताना त्याच्यावर हे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतरच तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

फंडींगच्या माध्यमातून ११ दिवसात ७० लाख जमा

कन्हैया ने आपल्याकडील जंगम संपत्तीचा देखील उल्लेख केला आहे. यामध्ये वडिलोपार्जित संपत्ती असल्याचे त्यांनी म्हटले. दीड एकर जमिनीवर एक दुकान असून त्याची आजच्या तारखेला दोन लाख इतकी किंमत असल्याचे म्हटले आहे. कन्हैया कुमार निवडणुकीसाठी फंडाच्या माध्यमातून ७० लाख रुपये गोळा केले आहेत. त्यांनी २६ मार्चला www.ourdemocracy.in नावाची वेबसाईट सुरु केली होती. ज्यात ११ दिवसात ७० लाख रुपये गोळा झाले आहेत. स्वतः ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिलीय.