खुशखबर ! जमा करा फक्त १२१ रुपये अन् मुलीच्या लग्नात मिळवा २७ लाख, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जर तुम्ही मुलीच्या भविष्याची चिंता करत असाल तर ही चिंता तुम्ही मिटवू शकतात, कारण यासाठी LIC ने एक नवी पॉलिसी आणली आहे. मुलीच्या जन्मानंतर आता लोक तिच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करतात. यासाठीच LIC ची अशी एक पॉलिसी आहे जी विशेष करुन मुलीच्या लग्नासाठी बनवण्यात आली आहे. LIC ने या पॉलिसीचे नाव देखील ‘कन्यादान’ योजना ठेवले आहे. ही पॉलिसी घेतल्यानंतर जर पॉलिसी सुरु करणाऱ्याचा मृत्यू झाला तर या पॉलिसीचा प्रिमियम भरण्याची गरज कुटूंबाला भासणार नाही आणि त्यांना १ लाख रुपये देखील देण्यात येतील. तसेच २५ वर्षांनंतर पॉलिसीच्या नॉमिनीला २७ लाख रुपये मिळतील.

महिना भरा १२१ रुपये मिळवा २७ लाख –
या योजनेत १२१ रुपये रोजच्या हिशोबाने जवळपास ३६०० रुपये महिना प्रीमियम द्यावा लागेल. परंतू जर कोणी कमी प्रीमियम किंवा जास्त प्रीमियम देऊ इच्छित असेल तर तसे प्लॅन देखील उपलब्ध आहेत. या पॉलिसीमध्ये तुम्ही २२ वर्षांपर्यंत प्रीमियम देऊ शकतात. रोज १२१ रुपये म्हणजे महिना जवळपास ३६०० रुपये जमा करावे लागतील. याशिवाय पॉलिसी घेतल्यानंतर वीमाधारकाचा मृत्यू झाला तर पॉलिसी प्रीमियम भरण्याची गरज भासणार नाही आणि दरवर्षी १ लाख रुपये देखील मिळतील.

अपघातात मदत –
याशिवाय २५ वर्ष पुर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या नॉमिनीला २७ लाख रुपये मिळतील. वडीलांच्या मृत्यूनंतर कुटूंबाला तात्काळ १० लाख रुपये मिळतील. अपघातात वडिलांचा मृत्यू झाल्यास ही रक्कम २० लाख रुपये देण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like