राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच : कपिल पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप प्रवेशासंबंधी माझेविषयी बातम्या व चर्चा चालू आहे. कपिल पवार भाजप मध्ये प्रवेश करणार आहे का? किंवा कपिल पवार काय भूमिका घेणार? कपिल पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा व युवक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मी कोणत्याही प्रकारचा राजीनामा अथवा भाजप मध्ये प्रवेश करणार नाही, असे युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांचे सोबत मी निष्ठेने काम करत आहे व यापुढेही करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. पुरोगामी विचार व पक्षाचे ध्येय धोरणे समाजात रुजवून राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील व सुप्रियाताई सुळे यांचे नेतृत्वाखाली व जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत राहणार आहे असे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –