कार्यकर्ते झाले अतिउत्साही, रोहित पवारांसह मंत्री शिंदे यांच्याही शुभेच्छेचे फलक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्या अगोदरच राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे फलक लावले. त्यानंतर मंत्री राम शिंदे यांच्याही विजयी फलक कर्जतमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
rohit p
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्याअगोदरच रोहित पवार समर्थकांनी अतिउत्साहीपणा दाखवून लावून विजयी फलक लावण्यास सुरुवात केली आहे.

त्यानंतर राम शिंदे यांच्याही कार्यकर्त्यांनी विजयी फलक लावले आहेत. अशा फलकांना कर्जत नगरपंचायत प्रशासनाने परवानगी दिली होती का? निकाल लागण्या अगोदरच परवानगी कशी मिळते मिळू शकते, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
ram
निकाल लागण्या अगोदर काही उत्साही कार्यकर्त्यांमुळे कर्जत, जामखेड तालुक्यातील पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरला आहे. उद्या होणार्‍या मतमोजणीत नेमका काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like