बंदिस्त गटारांची कामे रखडल्याने केडगाव ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – तीन वर्षांपूर्वी विकासकामांची भूमीपूजने झाली त्यानंतर कामे सुरू झाली. मात्र सुरू झालेली कामे अर्धवट राहून पुढील भूमी पूजनांना सुरुवात झाल्याने दौंड तालुक्यातील केडगाव येथील ग्रामस्थांमध्ये कमालीचा रोष व्यक्त करण्यात येत असून ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या विरोधात हे ग्रामस्थ धरणे आंदोलनास बसले आहेत.

गुरुवारी सकाळी ११ वाजता केडगाव ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत धरण्यावरून उठणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी बसपाचे योगेश कांबळे, बाळासो कांबळे, बापू कांबळे, शिवाजी गायकवाड, आकाश कांबळे हे धरण्यावर बसले असून यावेळी त्यांना केडगावमधील ग्रामस्थांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

काम त्वरित सुरू करणार ग्रामपंचायत केडगाव-

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या बंदिस्त गटारांची कामे आज गुरुवार पासूनच सुरू करण्यात येत असून ग्रामस्थांनी या हे आंदोलन थांबवावे अशी विनंती केडगावचे विद्यमान सरपंच अजित शेलार यांनी आंदोलकांना केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा