२३व्या लोकरंग महोत्सवात कत्थक आणि लावणीच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

पोलीसनामा ऑलनाइन – जयपूर येथे सूरु असलेल्या २३ व्या लोकरंग महोत्सवात काल दि १९ रोजी लावणी आणि कत्थक च्या अनोख्या जुगलबंदीला रसिकांनी मनमुराद दाद दिली.पुणे येथील प्रसिद्ध नृत्यांगना रेश्मा मुसळे आणि सहकलाकार तसेच जयपूर घराण्याचे गुरू हरीश गंगानी यांनी मिळून हे सादरीकरण केले.कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने झाली तर समारोप वंदे मातरम ने करण्यात आला. हे आगळ वेगळ सादरीकरण रसिकांना भावनिक करून गेलं.

राजस्थान सरकारचा उपक्रम असलेल्या जवाहर कलाकेंद्रात हा महोत्सव गेले दहा दिवस सुरू आहे.संगीत नाटक अकादमी दिल्ली, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि राजस्थान ललित कला अकादमी यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.देश विदेशातील नामांकित लोककला या दहा दिवसांत रसिकांना बघायला मिळाल्या.कला सदारीकरणासोबत ‘पुनर्भव’ हे इजिप्त येथील संस्कृतीचं कला प्रदर्शन तसेच अनेक हस्तकला प्रशिक्षण येथे सामान्यांना खुले होते.

पुण्याच्या रेश्मा मुसळे या संगीत नाटक अकादमी युवा पुरस्कार तसेच अनेक नामांकित पुरस्कारानी गौरविल्या गेल्या आहेत.पारंपरिक लावणीचे देश परदेशांत सादरीकरण करत त्या लावणीच्या मूळ पारंपरिक बाजाला लोकांसोमर उभे करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत.या वेळी मनन देव आणि कीर्ती बने यांनी गायलेल्या वंदे मातरम च्या फ्युजन ने वातावरण भावुक झाले होते.

visit : Policenama.com