किरण जगताप खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा ; जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – स्टेशन रोडवरील किरण जगताप ऊर्फ प्रेम याच्या हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करावी. गुन्ह्यात ‘ॲट्रॉसिटी’चे कलम वाढवावे, खटला जलदगती न्यायालयात चालवावा आदी मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात मयताचे नातेवाईकही सहभागी झाले होते.

याबाबत माहिती अशी की, किरण जगताप यांची हत्या किरकोळ कारणातून स्वस्तिक चौक बस स्थानकासमोर झालेली आहे. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. आज मयत किरण याच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना मोर्चातील शिष्टमंडळाने निवेदन दिले. आरोपींना तात्काळ अटक करावी. गुन्ह्यात ‘ॲट्रॉसिटी’चे कलम वाढवावे, खटला जलदगती न्यायालयात चालवावा आदी मागण्या करण्यात आल्या.

या मोर्चात हिंदूराष्ट्र सेनेचे दिगंबर गेंट्याल, शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड, माजी नगरसेवक अनिल शेकटकर, विजय गायकवाड, किरण घोरपडे, निलेश बांगर चंद्रकांत पाटोळे, आकाश त्रिभुव आदी सहभागी झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज

दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय

You might also like