सावधान ! कुल्लू – मनाली राष्ट्रीय महामार्ग 3 ला पुरामुळे पडलं भगदाड

शिमला : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेश मधील मनाली आणि कुल्लू मनाली हे शहर पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. अनेकजण आपल्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी येथे जात असतात. मात्र जर कोणी या पावसाळ्यात मनालीला जाण्याचा विचार करत असेल तर त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये सध्या पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी महापूर येत असून अनेक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. मनाली आणि कुल्लू मनाली येथील राष्ट्रीय महामार्ग ३ चीही अशीच काहीशी परिस्थिती आहे. पावसाच्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्गाला अक्षरशः भगदाड पडले आहे. आणि पाणी आता महामार्गाच्या दिशेने वाहू लागले आहे.

पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. पुरामुळे राष्ट्रीय महामार्गाची एक बाजू अक्षरशः वाहून गेली आहे आणि भला मोठा खड्डा या ठिकाणी पडला आहे.

राजधानी दिल्लीतही तीच परिस्थिती आहे. दिल्लीत सुद्धा जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे दिल्लीकरांना प्रवास करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे दिल्ली महानगर पालिकेसमोर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने चित्र पहायला मिळाले.

आरोग्यविषयक वृत्त –