लालबागच्या राजाच्या चरणी गणेशभक्‍ताकडून 1 किलो 237 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेटचे सोन्याचे ताट, वाटी, चमचे, ग्लास अर्पण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लालबागचा राजा गणेशोत्सवाचं हे 86 वं वर्ष आहे. त्यामुळे या वर्षीचा उत्सव कायम स्मरणात रहावा यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सध्या जीवाचं रान करताहेत. दरवर्षी लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागतात.

यावेळी अनेक भक्त राजाचरणी आपले मोठं मोठे दान देत असतात. कोणी दानपेटीत दान टाकतो तर कोणी पैशांच्या स्वरूपात दान करतो. मात्र नुकतेच लालबागचा राजाच्या चरणी अज्ञात गणेशभक्ताकडून १ किलो २३७ ग्रँम वजनाचे २२ कॅरेट सोन्याचे ताट, वाटी, चमचे, ग्लास अर्पण करण्यात आपले आहे. दान करणाऱ्याचे नाव मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सामान्य लोकांपासून फिल्म स्टारपर्यंत लोकं आपल्या कुटुंबियांसोबत येत असतात. लालबागच्या राजाने साकारलेला यंदाचा देखावा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणारा आहे.

चांद्रयान २ च्या देखाव्याची सर्वत्र चर्चा –

यावर्षी लालबागच्या राजाच्या देखाव्यात चांद्रयान – २ आणि अंतराळवीर बघायला मिळत आहे.
यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या मागे अंतराळाचा देखावा साकारण्यात आला आहे. यात अंतराळवीर, सॅटेलाइट आणि मागे ३ डी देखावा साकारण्यात आला आहे. रोमहर्षक आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा हा देखावा असल्यामुळे भक्त दर्शनाने नक्कीच खुश होतील.

आरोग्यविषयक वृत्त –

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी

नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर