‘पाद्यपूजना’नंतर आता लालबागच्या ‘राजा’ची मूर्ती साकारण्यास होणार प्रारंभ

मुंबई : वृत्तसंस्था – संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘पाद्यपूजना’चा सोहळा पार पडल्याने आता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास प्रारंभ होणार आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा गुरुवारी पार पडला.

या सोहळ्याला शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आदित्य ठाकरे यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबागचा राजा या गणपतीची ख्याती देशविदेशात पसरली आहे.

पाद्यपूजन सोहळ्यानंतर राजाची मूर्ती बनविण्यास सुरुवात होईल. या सोहळ्याचे लाइव्ह दर्शन मंडळाच्या फेसबुक, युट्यूब पेज तसेच वेबसाइटवर करण्यात येत आहे. या वर्षीही पाद्यपूजन सोहळ्याला भक्तांची मोठी गर्दी झाली आहे.