लातूरच्या उमेदवारी संभ्रमावर भविष्यवाणी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर मधूनच भाजपाचे नेते अमित शहा यांनी निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. तर त्याच सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला पटक देंगे ची भाषा केली. मात्र, त्याच लातूरच्या उमेदवारीचा प्रश्न अद्याप संभ्रमावस्थेत आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी अद्याप कोणालाही उमेदवारी दिली नाही.

भाजपाकडून सुनील गायकवाड, दिग्विजय काथवटे, सुधाकर भालेराव, सुधाकर शृंगारे यांची नावे चर्चेत आहेत. दिल्ली-मुंबईत त्यावर खलबतं होत आहेत. मात्र कोण उमेदवार असणार हे स्पष्ट होत नाही. तर्क वितर्कांप्रमाणे लातुर च्या एका भविष्याकार महाराजांनी यावर भविष्यवाणी केलीय. सुनील गायकवाड यांचं नाव प्रथम क्रमांकावर तर दिग्विजय काथवटे यांचं नाव क्रमांक दोन ला चलत आहे तर सुधाकर शृंगारे यांच नाव तिसऱ्या क्रमांकावर चालत आहे.

काल झालेल्या बेठकित नाव निश्चीत झालं असेल. मात्र कुठल्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पहावं लागणार आहे. मात्र एस नावाचे कॅरेक्टर काम करणार नाही. आणि तसं झालं तरी त्यांना निवडणूक कठीण जाईल असा अंदाज बांधला जात आहे. आज उद्या काय ते कळेल. भाजपा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातील सर्वजण आपणच उमेदवार असल्याचं बोलत आहेत. मात्र पक्ष कोणाचं भविष्य बलवान समजते हे पहावं लागणार आहे. याखेरीज पालकमंत्री यांनी अनेकवेळा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे चर्चेपलीकडचं नाव जरी समोर आलं तर पुन्हा अशचर्य वाटायला नको.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us