देऊर शिवारात धुमाकुळ घालुन दोन वनमजुरांना जखमी करणार बिबट्या चार दिवसांनी जेरबंद

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील देऊर गावातील शेतात चार दिवसांपासून धुमाकुळ घालणारा बिबट्याला आज सायकांळी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पकडण्यात वन विभाग कर्मचारींना यश आले.

चार दिवसांपुर्वी शेतात सावज शोधात बिबट्या फिरताना शेतकरीनी बघितला होता.वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली.माहिती मिळताच वन विभाचे अधिकारी व वन मजूर फौज फाट्यासह बिबट्याला पकडण्यासाठी शेतात गेले असता बिबट्यांने वनमजूरांवरच हल्ला चढवला यात दोन वन मजुर जखमी झाले होते.परिसरात बिबट्याच्या मुक्त वावरामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते.

बिबट्याला पकडण्यासाठी शेवटी शेतात लोंखंडी पिंजरा व त्यात भक्ष लटकविण्यात आले.बिबट्या सायंकाळच्यावेळी पिंजऱ्यातून भक्ष ओढुन बाहेर पळण्याच्या प्रयत्नात असतानाच पिंजऱ्यांचे लोखंडी गेट बंद झाले.बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी व वन विभाग अधिकारी,कर्मचारी साऱ्यांनीच सुटकेचा श्वास घेतला.

बिबट्याला सातपुड्यातील जंगल भागात सोडण्यात येईल अशी माहिती वन विभाचे अधिकारी यांनी प्रसार माध्यमांना दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/