अकोले : विहिरीत पडला बिबट्या

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – अकोले शहरातील गुरवझाप येथील शेतकरी सीताराम लक्ष्मण चौधरी यांच्या विहिरीत बिबट्याचा बछडा आढळून आला. भक्ष्याच्या मागे पळत असलेल्या बिबट्याला विहिरीचा अंदाज न आल्याने हा बिबट्या विहिरीत अचानकपणे कोसळला.

साधारणतः सहा महिने वयाचा हा बिबट्या असावा,असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.पाण्यात पडल्यामुळे हा बिबट्या थंडीने चांगलाच कुडकूडला होता.बराच वेळ उलटून गेला तरी वनविभागाने बिबट्याला पाण्यातून बाहेर काढण्याची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वनविभागावर नाराजी व्यक्त केली.या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

अखेर सकाळी 11 वाजेच्या सुमारास या बिबट्याला विहिरीत पिंजरा सोडून बाहेर काढण्यात आले. दरम्यान या परिसरात बिबट्याचे मोठे वास्तव्य असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like