लॉकडाऊनमध्ये बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी गेली तरूणी, परत आली आणि घर पाहून बसला धक्का !

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रकोप रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला होता. लॉकाडाऊन दरम्यान तमाम लोक आपआपली घरे सोडून गावी आपल्या जुन्या घरी गेली होती. असेच पण काहीसे आगळेवेगळे एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. एक तरूणी लॉकडाऊनमध्ये आपले घर बंद करून काही महिन्यांसाठी गेली होती. यानंतर जेव्हा ती परत आली आणि घर उघडले, तेव्हा घराची अवस्था पाहून ती हैराण झाली.

फ्रान्सची एक तरूणी आपला फ्लॅट लॉकडाऊनमध्ये बंद करून गेली होती. जेव्हा ती तीन महिन्यांनंतर परतली तेव्हा किचनची आवस्था पाहून हैराण झाली. तिने पाहिले की किचनमध्ये गुलांबी रंगाच्या रेषा दिसत होत्या, ज्या एखाद्या एलियन ट्रीप्रमाणे दिसत होत्या. हे पाहून ती खुपच घाबरली, यानंतर तिने पुन्हा निरखून पाहिले तेव्हा समजले की, ते कोणतेही एलियन ट्री नसून बटाट्याची रोपे होती.

फ्रान्सच्या या महिलेचे नाव डोन्ना पोरी आहे, जिचे वय 22 वर्ष आहे. तिने ट्विटरवर किचनमध्ये उगवलेल्या रोपांचे फोटो शयर केले आहेत. डोन्नाने सांगितले की, तिने मार्चमध्ये लॉकडाऊनमध्ये बटाटे खरेदी करून ठेवले होते. ज्यानंतर तीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

डोन्नाने सांगितले की, जेव्हा तीन महिन्यानंतर ती आपल्या फ्लॅटमध्ये परत आली तेव्हा स्वयंपाक घरात पाहिले असता एक अजब आकार दिसला. हे एक असामान्य दृश्य होते. त्या अंकुरित बटाट्यांनी फर्नीचरच्या सांध्यांनासुद्धा तोडले होते.

डोन्नाने सांगितले, बटाट्याच्या रोपांच्या फांद्या भिंतीवरून काढण्यासाठी अनेक तास लागले. जे खुप अवघड काम होते. तिने कात्रीच्या मदतीने त्याचे तुकडे केले. डोन्नाने याचे फोटो काढून ते ट्विटरवर पोस्ट केले. ज्यामध्ये तिने हेदेखील लिहिले की, पुढच्या वेळी जर तुम्हाला घरातून बाहेर जायचे असेल तर घरात बटाटे ठेवू नका.