गावच्या सर्वांगीण विकासासाठी जि. प. व पं. स. कडून 1 कोटी 32 लाखाचा निधी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराचे विस्तारीकरण होत असताना शहराशेजारील गावाचे मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण वाढत गेले अशावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती याच्या माध्यमातून ही विकासात्मक कामे हाती घेण्यात आली. पूर्व हवेलीतील पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर गावच्या विकासात कायम अग्रेसर असणारे जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार व पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर यांनी निधी उपलब्ध करुन नागरी सुविधा पुरविल्या.

हवेली तालुका सधन व हरित पट्टा म्हणून ओळखला जातो. येथे बारमाही पाण्याची उपलब्धता असल्याने या परिसरात गावांचा झपाट्याने विकास होत गेला. आज ही विकसनशील शहरे म्हणून नावारुपाला आलेली आहेत. यात लोणी काळभोर हे विकासात अग्रभागी आहे. येथे लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरी सुविधाची मागणी वाढत गेली यामध्ये रस्त्याची मागणी सर्वात जास्त होती तसेच शाळा दुरुस्ती मंदीर परिसराचे सुशोभिकरण या व अशा विविध कामासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती याच्या माध्यमातून नुकताच एक कोटी बत्तिस लाख रुपयाचा निधी मंजूर केला.

या कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, माधव काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, सुभाष काळभोर, लोणी काळभोर च्या उपसरपंच सिमा काळभोर, योगेश काळभोर, आण्णासाहेब काळभोर, ग्रामविकास अधिकारी डी के पवार उपस्थित होते.

Visit :- policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like