मानव कल्याण कमिटी व उमंग बहुउद्देशिय फिल्म असोसिएशनचे सामाजिक व कलाक्षेत्रात उल्लेखनीय काम

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – मानव कल्याण कमिटी व उमंग बहुउद्देशीय फिल्म असोसिएशन यांच्या माध्यमातून सामाजिक व कला क्षेत्रात काम करणार्या कलाकारांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे काम केले जात असून नविन कलाकाराच्या कलेची कदर केली जाते नुकताच संस्थेचा पाचवा वर्धापन दिन पार पडला यावेळी संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक राजेंद्र लिंगाडे व ए.शी.पी सुमित भालके उपस्थित होते.

यावेळी  रामदास सखाराम हाके यांची उमंग बहुउद्देशीय फिल्म असोसिएशन पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांना नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेकडून सामाजिक व कला क्षेत्रात काम करत असताना तळागाळातील कलाकार, संगीतकार, तसेच इतर अडगळीतील कलाकार लोकांना मदत करून त्यांना योग्य मंच तयार करून देऊन त्यांना प्रोत्साहित करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट असणार आहे.

लवकरच ही संस्था लघुपट महोत्सवाचे आयोजन करणार असून नवनवीन चित्र कृतींची निर्मिती करण्याचाही त्यांचा मानस आहे.या कार्यक्रमाला रंजना बंग, नानासाहेब गराडे, आकाश सोलंकी, हर्षित अभिराज  संस्थेचे सचिव जयराज मोरे,जेष्ठ गायक इकबाल दरबार, मूकबधिर व अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या सुनीता मदाने,  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील संस्थेचे इतर  कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाची सर्व धुरा कला विश्व् क्रिएशन ने सांभाळली. 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like