‘महापरीक्षा पोर्टल बंद नाही, तर या सरकारला मत नाही !’ ; स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात याव्यात या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. हे उपोषण पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर सुरु आहे. ५ ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.

महापरीक्षा पोर्टल बंद नाही तर या सरकारला मत नाही’ असा इशारा देखील विद्यार्थ्यांनी दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थ्यांनी फडणवीस सरकारला हा इशारा दिला आहे. MPSC समन्वयक समितीने या उपोषणाचे आयोजन केले आहे.

महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्यात. डमी उमेदवारांना पकडल्यानंतर त्यांची SIT द्वारे चौकशी करावी, या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या उपोषणात सहभागी व्हावे आणि उपोषणाला पाठींबा द्यावा असे आवाहन समितीने केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –