मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार, पण ‘या’ 5 दिग्गज मंत्र्यांना ‘डच्चू’ मिळणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. हे निश्चित झालं आहे. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास राजभवनाच्या गार्डनवर पार पडणार आहे. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात काही दिग्गजांचा समावेश होणार आहे. तर काहींचा पत्ता कट होणार आहे. मात्र या सर्वांमध्ये मित्रपक्षांपैकी रिपाईंला एक मंत्रिपद मिळणार आहे.

यांना मिळणार संधी

राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती सुत्रांनी दिली.

यांना मिळणार डच्चू

मंत्रिमंडळ विस्तारात फेरबदल करताना मुख्यमंत्र्यांकडून काही जणांना डच्चू मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात पाच दिग्गजांची नावे आहेत. काही जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. तर काही मंत्र्यांची कामगिरी सुमार असल्याचे कारण समोर करण्यात आले आहे.

त्यात राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरिश आत्राम, विष्णू सावरा यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

प्रकाश मेहता यांना एमपी मील प्रकरण भोवणार

ताडदेव येथील एमपी मील कंपाउंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांचा कारभार पारदर्शी नसल्याचा अहवाल लोकायुक्तांनी सादर केला आहे.  प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर या संदर्भात सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. त्याचा फटका मेहतांना बसणार आहे. त्यात प्रकाश मेहता यांचे मंत्रिपद जाणार अशी माहिती सुत्रांनी दिली.

रिपाईंची अविनाश महातेकरांना संधी

रिपाईंला एक मंत्रिपद मिळणार असून अविनाश महातेकर यांना ही संधी राज्यात दिली जाणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

फडणवीस मोदी यांच्यात चर्चा

राज्यात मंत्रिमंडळातील ७ जागा रिक्त आहेत. या सात जागांवरह कोणाला संधी द्याची यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. या बैठकित तीन पर्यायांवर चर्चा झाली. अशी माहिती सुत्रांनी दिली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून आमदार संजय कुटे आणि अतूल सावे यांना संधी मिळणार आहे.

सिने जगत –

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

Loading...
You might also like