तुम्ही पाहिलं का ? ‘सत्तेच्या’ खुर्चीसाठी नेत्यांची ‘रस्सीखेच’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या सत्तास्थापनेचा तिढा सुटला असून राज्यकीय नाट्याला आता पुर्णविराम मिळाला आहे. सत्तेसाठी राजकीय नेत्यांची कशी रस्सीखेच सुरु असते हे आपण नेहमीच पाहतो. राजकीय पक्षाचे नेते सत्तेच्या खुर्चीसाठी कोणत्याही थराला जातात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून सत्तेच्या खुर्चीसाठी कशापद्धतीने रस्सीखेच केली जाते हे सांगण्यात आले आहे. एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून ‘महाराष्ट्र पॉलिटिकल ड्रामा’ नावाचा हॅशटॅग वापरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

https://twitter.com/Atheist_Krishna/status/1199351145757433856

किस्सा खूर्ची का हो, या कॅबिनेट का ? फेविकॉल ऐसा जोड लगाये, अच्छे अच्छे ना तोड पाए. असं या जाहिरातीतून सांगण्यात आलं आहे. फेविकॉल जाहीरातीचा हा व्हिडीओ आहे. सोशल मिडीयावर आता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायर झालेला व्हिडीओ आणि महाराष्ट्रात उद्भवलेली परिस्थिती थोड्याफार प्रमाणात साम्य असल्याचे दिसून येते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय महानाट्य संपूर्ण देशाने पाहिले. यामुळे महाराष्ट्रात नेमकी कुणाची सत्ता येणार आणि मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत मोठं कुतूहल निर्माण झाले होते.

अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मात्र सत्तेच्या खुर्चीसाठी राजकीय नेते कसा खेळ करतात हे या व्हिडीओतून स्पष्ट सांगण्यात आले आहे.

Visit : Policenama.com