‘महाराष्ट्र एज्युकेशन’ सोसायटी शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष अभिवादन यात्रेचा सासवड येथे समारोप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे ) – मंगळवार रोजी सकाळी ठीक – 9.00 वाजता मएसो वाघिरे विद्यालय-सासवड या शाखेतून अभिवादन यात्रा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेला शिक्षण क्षेत्रात एकशे साठ वर्षे पूर्ण झाली, असून त्यानिमित्ताने सासवडमधील मएसो वाघिरे विद्यालयामार्फत सासवड शहरातून अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू करण्यासाठी पहिले पाऊल उचलणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके कै. वामन प्रभाकर भावे, कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर या महान व्यक्तींची कार्याची प्रेरणा घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी कार्यरत आहे .

संस्थेला 160 वर्षे पूर्ण झाल्यामुळे संस्था शतकोत्तर हीरक महोत्सव वर्ष साजरा करत आहे. त्या निमित्ताने सासवड शहरातील नगरपरिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व संस्था संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके कै. वामन प्रभाकर भावे कै. लक्ष्‍मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय नगराध्यक्ष श्री. मार्तंड लक्ष्मण भोंडे, मा. सौ. रुपाली सरनौबत (तहसिलदार पुरंदर तालुका ) मा. श्री रामभाऊ डिंबळे (माझी शाळा समिती अध्यक्ष ) मा.बाबासाहेब शिंदे (शाळा समिती अध्यक्ष ) मा. डॉ. अंकुर पटवर्धन (शाळा समिती महामात्र) मा.मुख्याध्यापक श्री.शिंदे आर व्ही,उपमुख्याध्यापक श्री. जाधव जी. जी ,अभिवादन यात्रा प्रमुख श्री दराडे. एच. आर तसेच पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा सौ. झेंडे , माजी शिक्षक, माजी विद्यार्थी ,  हितचिंतक यांच्या उपस्थितीत अभिवादन यात्रा .सासवडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ,हाडको रोड सोपान नगर, बस स्टॅन्ड, मेनरोड, हुंडेकरी चौक या ठरलेल्या नियोजनानुसार अभिवादन यात्रा गेली. अभिवादन यात्रा समारोप सकाळी ठीक .11.00 वा. म ए सो वाघीरे विद्यालय येथे करण्यात आला .

कार्यक्रमात मा.सौ. रुपाली सरनौबत(तहसिलदार पुरंदर तालुका ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, मा. श्री. रामभाऊ डिंबळे यांनी संस्था व संस्थेची माहिती,ध्येयधोरणे भूमिका, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभिवादन यात्रा यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी ढोलपथक, घोषणा पथक यांच्या योगदानाने व प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, म.ए.सो परिवार व पालक शिक्षक संघ यांच्या सहकार्याने अभिवादन यात्रा नियोजनानूसार यशस्वीपणे पार पडली. मा.मुख्याध्यापक श्री. शिंदे. आर व्ही. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रुपाली घोलप यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अभिवादन यात्रा प्रमुख श्री.दराडे एच .आर यांनी केले. अभिवादन यात्रा यशस्वीपणे, नियोजनपूर्वक पार पडावी. यासाठी प्रशालेचे मा.मुख्याध्यापक शिंदे आर व्ही यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Visit : Policenama.com