‘त्या’मुळं मनसैनिकांना पोलिसांच्या नोटिसा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोहिनुर मिल संदर्भात गुरुवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील बलार्ड पियर येथील ईडी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. त्यादरम्यान मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांना कलम १४९ च्या अंतर्गत नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने बजावलेल्या नोटीसीनंतर प्रवीण चौगुले या ठाण्यातील तरुणाने आत्मदहन केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सांताक्रूझ गोळीबार येथे राहणारा २९ वर्षीय तरुण गणेश मस्के यांनी पोलिसांना फोन करून आत्मदहन करण्याचा इशारा दिला. या फोननंतर शिवाजी पार्क व दादर पोलीस अलर्ट झाले.

तसेच पोलिसांनी कृष्णकुंज परिसरात मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.त्यात मुंबई पोलिसांच्या वतीने मनसे कार्यरत व पदाधिकारी यांना प्रतिबंधक नोटीस बजावण्यात येत आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्यात नाराजीचे सूर उमटत आहे.

आरोग्यविषयक वृत्त