महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचे कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम वाहिनी दमणगंगा, नार-पार नद्यांचे पाणी गुजरातकडे वळविण्याचे कारस्थान आता अंतिम चरणावर आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्य सरकारवर केला आहे.

मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकरीता या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी हा एक चांगला पर्याय होता. माजी मुख्य मंत्री विलासराव देशमुख यांनी दमणगंगेचे पाणी मराठवाड्यात आणण्याचा संकल्पही सोडला होता. परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. गुजरातमध्ये धोलेरा नांवाची स्मार्ट सिटी वसविली जात आहे. धोलेरा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नार-पारचे पाणी वळविण्याचे षडयंत्र रचले जात आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.

पक्षाची महत्वपूर्ण बैठक आज मुंबई येथील पक्षकार्यालयात झाली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर पक्षाने ट्विटरद्वारा पश्चिमवाहिनी नद्यांच्या पाण्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली.

गुजरातच्या टोरंट कंपनीला २८५ कोटींची थकीत कर्जमाफी देत फडणवीस सरकारने पुन्हा एकदा गुजरात प्रेम दाखवून दिले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

सिने जगत – 

ऋतिक रोशन ‘या’ अभिनेत्रीचा मोठा ‘फॅन’

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय

‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे