महिंद्रा ब्लेझोने दाखल झाल्यापासून 3 वर्षांमध्ये देशातील सर्वात इंधनक्षम ट्रक म्हणून निर्माण केले स्थान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महिंद्रा ट्रक अँड बस (एमटीबी) या 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा ग्रुपचा भाग असणाऱ्या कंपनीने ब्लेझो या आपल्या ट्रक उत्पादनांनी ट्रक उद्योगामध्ये मायलेजच्या बाबतीत आघाडीचे स्थान साध्य केले असल्याचे जाहीर केले आहे. ब्लेझो ट्रक उत्पादने दाखल झाल्यापासून केवळ 3 वर्षांमध्ये त्यांनी हे आघाडीचे स्थान निर्माण केले आहे आणि सध्या अन्य स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत जोरदार विक्री करत आहे.

एमटीबी BSVI उत्पादने सादर करून आपले स्थान अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्राहकांसाठी BSVI सुलभ करण्याचाही कंपनीचा प्रयत्न सुरू आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे, BSVI प्रकारातील 80% भाग बदलले जाणार नाहीत.

कंपनीने 16-चाकी श्रेणीमध्ये ब्लेझो X 49 रिजिड एमएव्ही ट्रक दाखल केला असून, त्यामध्ये अधिक मायलेज व पेलोड हे ब्लेझोचे मूलभूत फायदे समाविष्ट आहेत. नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या आयसीव्ही (इंटरमीडिएट कमर्शिअल व्हेइकल) श्रेणीमध्ये, 12 टन व 14 टन या श्रेणींमध्ये चौथ्या क्रमांकाची कंपनी म्हणून नावारूपास येऊन एमटीबीडीच्या फ्युरिओने लक्षणीय यश मिळवले आहे. कंपनीने आणखी तीन प्रकार अलीकडेच दाखल केले आहेत आणि उत्पादनांत वाढ करण्याच्या अनुषंगाने आयसीव्ही श्रेणीमध्ये 5 ते 18 टनांमध्ये आणखी 18 प्रकार दाखल करणार आहे.

याविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी नमूद केले, “एचसीव्ही श्रेणी सध्या कठीण काळातून जात असताना, या श्रेणीमध्ये आघाडीवर राहण्यासाठी सातत्याने नावीन्य आणण्याची आवश्यकता आहे, असे आम्हाला वाटते. यामुळेच ब्लेझोने मायलेजच्या बाबतीत प्रचंड यश मिळवले आहे. विविध प्रकारचे ट्रक व बस, नवे सुलभ तंत्रज्ञान आणि खात्रीशीर अधिक मायलेजचे विशेष वैशिष्ट्य यामुळे आम्ही BSVI कम्प्लायंट बनण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करत आहोत.”

महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सहाय यांनी सांगितले, “मायलेजच्या शाश्वतीबाबतचे आमचे वैशिष्ट्य कायम राखत, 16-चाकी श्रेणीतील नवा ब्लेझो X 49 रिजिड एमएव्ही ट्रक अधिक मायलेज व पेलोड याद्वारे अधिक बचत करतील व अधिक उत्पन्न मिळवतील, याची दक्षता घेतो. फ्युरिओ ही आमची नव्याने दाखल केलेली उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. येत्या काही महिन्यांत या उत्पादनांचे 18 नवे प्रकार दाखल करून आम्हाला या श्रेणीतील फुल-रेंज कंपनी बनण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. कर्मचारी व शाळा या श्रेणीतील लाँग प्लॅटफॉर्म ओव्हरहँग (एलपीओ) बसेसची क्रुझिओ रेंज व्यावसायिक पद्धतीने दाखल करणार आहोत.”

कंपनी मुंबई, दिल्ली, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि जम्मू व काश्मीर व ईशान्य अशा महत्त्वाच्या ठिकाणी आर्थिक वर्ष 20 मधील पहिल्या सहामाहीत हॉलेज श्रेणीतील (मल्टि अॅक्सल व्हेइकल व + ट्रॅक्टर ट्रेलर) तिसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून नावारूपास आली आहे.

एमटीबीडी – सर्व नवे उपक्रम
बहुतेकशा नव्या इंजिनांमध्ये गुंतागुंत असताना, एमटीबीडी ग्राहकांना सुलभ BSVI अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहे. किमान बदल करून ग्राहकांसाठी ब्लेझो X उपलब्ध केली जाणार आहे व त्यामुळे BS VI मध्ये सहजपणे परिवर्तन केले जाणार आहे. कंपनी नुकत्याच दाखल केलेल्या फ्युरिओ रेंजमध्ये 5 ते 18 टन आयसीव्ही श्रेणीमध्ये आणखी 18 प्रकार दाखल करणार आहे.

कंपनीने काश्मीर ते कन्याकुमारी अशा 3,800 किमी लांबीच्या पट्ट्यामध्ये एक्स्प्रेस नॉर्थ-साउथ सर्व्हिस कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणाही केली आहे. काश्मीर ते कन्याकुमारी सर्व्हिस कॉरिडॉरमुळे कंपनीचे विक्रीचे जाळे अधिक सक्षम होणार आहे. यामध्ये प्रत्येक 100 किमीवर एक अशा 41 सर्व्हिस टचपॉइंट्सचा समावेश असेल. 4 तास या सर्व्हिस उपलब्धतेची हमी दिली जाईल किंवा विलंब झाल्यास प्रत्येक तासाला 500 रुपये भरपाई दिली जाईल. ट्रक वाहतुकीमध्ये अंदाजे 30% योगदान देणाऱ्या मुंबई-दिल्ली सर्व्हिस कॉरिडॉरनंतरचा हा दुसरा सर्व्हिस कॉरिडॉर आहे.

एमटीबी उत्पादनांना 100 हून अधिक 3S डीलरशिप, 210 अधिकृत सर्व्हिस सेंटर, रिटेल आउटलेटचे व्यापक जाळे व मोक्याच्या ठिकाणी असलेले 39 पार्ट्स प्लाझा अशा व्यापाक व सातत्याने वाढत्या सर्व्हिस व स्पेअर्स नेटवर्कचे पाठबळ आहे.

ब्लेझो ट्रकचे यश
ब्लेझो X आज मायलेजच्या बाबतीत निर्विवादपणे आघाडीवर आहे. भारतीय रस्त्यांवर सध्या 26,000 हून अधिक ब्लेझो धावत आहेत आणि त्यांनी एकत्रितपणे 1100 कोटींहून अधिक किमी अंतर कापले आहे.

उत्तम मायलेज व ट्रक सांभाळायचा कमी खर्च, यामुळे ब्लेझो अतिशय यशस्वी झाले आहेत. ऑइल चेंज इंटरव्हल, तेलाचा घटता खर्च व 6 वर्षे / 6 लाख किमी ट्रान्स्फरेबल वॉरंटी या वैशिष्ट्यांमुळे हे यश मिळवणे शक्य झाले आहे.

सहा प्रकारची हमी देणारा महिंद्रा ब्लेझो हा भारतातील एकमेव ट्रक आहे. त्यामध्ये, अन्य ट्रकच्या तुलनेत ग्राहकांना खात्रीने उत्तम इंधनक्षमता देण्याच्या किंवा ग्राहकांना ट्रक परत करण्याची मुभा देण्याच्या शाश्वतीचाही समावेश आहे. एमटीबीडीने ब्रेकडाउन सेवेसंबंधी कालावधीच्या बाबतीतही सुधारणा केली असून ट्रक 48 तासांच्या आत पुन्हा सुरू करून देण्याची हमी दिली आहे, असे न झाल्यास कंपनी ग्राहकांना दररोज 1000 रुपये देणार आहे. याचबरोबर, डीलर वर्कशॉपमध्ये वाहनावर 36 तासांत काम करून दिले जाणार आहे आणि तसे न झाल्यास कंपनी दररोज 3000 रुपये देणार आहे.

एमटीबीडीने मायलेजच्या बाबतीत दिलेली हमी हे इंजिनीअरिंग उत्कृष्टतेचे आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याच्या निश्चयाचे प्रतिक आहे. समूहाचा सहयोग आणि सर्व्हिस टच पॉइंट व स्पेअर्स रिटेलर नेटवर्क यामध्ये झालेली ऑरगॅनिक वाढ यांचा लाभ घेऊन सक्षम आफ्टर-सेल्स नेटवर्कवर अधिक भर दिल्याने सर्व्हिस व स्पेअर्सची हमी देणे शक्य झाले आहे. उत्पादनामध्ये सातत्याने आणलेले नावीन्य व ग्राहक-केंद्रितता हा एमटीबीडीचा गाभा आहे आणि त्यामुळेच या हमी देता आल्या आहेत.

सोशल मीडिया अपडेटसाठी पुढील हॅशटॅग/हँडल्स यांचा वापर करा:

#MahindraTruckAndBus
@MahindraTrukBus
@MahindraRise

महिंद्रा ट्रक अँड बस (एमटीबी)
महिंद्रा ट्रक अँड बस परिपूर्ण ट्रकिंग सोल्यूशन्स उपलब्ध करते. विविध प्रकारच्या वापरांसाठी विशिष्ट प्रकारचे ट्रक तयार करून आणि व्यवसायाच्या गरजा काहीही असल्या तरी सरस कामगिरी करून कंपनीने आपली कामगिरी आणखी उंचीवर नेली आहे. उच्च कामगिरी करणारी वाहने, ग्राहकांसाठी “अधिक मायलेज मिळवा किंवा ट्रक परत करा” अशा ग्राहाकंना अधिक मूल्य देणाऱ्या उल्लेखनीय सेवा आणि कामगिरीशी संबंधित अशा अन्य काही हमी याद्वारे एमटीबीने भारतीय व्यावसायिक वाहन उद्योगामध्ये नवा बेंचमार्क निर्माण केला आहे. आज, एमटीबीने आफ्टर सेल्स सेवेमध्ये व स्पेअर्स नेटवर्कमध्ये झपाट्याने वाढ केली आहे. कंपनीकडे नाऊ ही भारतातील पहिली बहुभाषिक 24X7 हेल्पलाइन आहे. ग्राहकांना व चालकांना तातडीने मदत व सहकार्य करण्यासाठी यामध्ये तांत्रिक तज्ज्ञ समाविष्ट केले आहेत. नाऊ मोबाइल सर्व्हिस व्हॅन व मोबाइल वर्कशॉप यामुळे सपोर्ट नेटवर्कच्या व्याप्तीमध्ये व तत्परतेमध्ये आणखी वाढ झाली आहे.

स्थापना झाल्यापासूनच, एमटीबी भारतातील ट्रकिंग व कमर्शिअल व्हेइकल उद्योगाला नवे आयाम देण्यासाठी नवनवे प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांची योग्य दखल घेतली गेली आहे आणि ब्रँडला विविध पुरस्कारांनी व गौरवांनी सन्मानित करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी पाहा
www.mahindra.com
www.mahindratruckandbus.com
www.mahindralcv.com

पुरस्कार व गौरव
स्थापना झाल्यापासूनच, एमटीबी भारतातील ट्रकिंग व कमर्शिअल व्हेइकल उद्योगाला नवे आयाम देण्यासाठी नवनवे प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांची योग्य दखल घेतली गेली आहे आणि ब्रँडला विविध पुरस्कारांनी व गौरवांनी सन्मानित करण्यात आले आहे. ब्रेझोसारख्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उत्पादनासाठी प्रतिष्ठेचा सीव्ही-अपोलो पुरस्कार, आयएटीआयएकडून फ्युएलस्मार्ट तंत्रज्ञानासाठी बेस्ट टेक्नालॉजी इनोव्हेशन पुरस्कार, वर्ल्ड ऑटो फोरमकडून बेस्ट इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड, एबीपी न्यूज ब्रँड एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड, इकॉनॉमिक टाइम्स प्रॉमिसिंग ब्रँड अ‍ॅवॉर्ड, व्हाइट पेज इंटरनॅशनल – इंडियाज मोस्ट अ‍ॅडमायर्ड ट्रक ब्रँड अँड इन्स्पिरेशनल बिझनेस लीडर अ‍ॅवॉर्ड, एआयएमए अ‍ॅवॉर्ड फॉर ब्रेकथ्रू इनोव्हेशन्स असे पुरस्कार असोत किंवा 9व्या इंडिया डिजिटल अ‍ॅवॉर्ड ऑफ आयएएमएआयमध्ये मोस्ट कन्सिस्टंट एक्सलन्स इन डिजिटल पब्लिशिंग पुरस्कार असो, हे सर्व सन्मान एमटीबीच्या केवळ 9 वर्षांच्या कालावधीमध्ये मिळाले आहेत.

महिंद्राविषयी
20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे.त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.

महिंद्राविषयी अधिक माहितीसाठी पाहा www.mahindra.com / ट्विटर व फेसबुक @MahindraRise

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी