मंत्रालयातील धक्कादायक प्रकार ! दूषित पाण्यामुळे शेकडो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होत आहेत उलट्या आणि जुलाब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मंत्रालयात नेहमीच गर्दीचे वातावरण असते. हजारोच्या कर्मचारी आणि अधिकारी याठिकाणी काम करतात. अनेक प्रकारच्या वैयक्तिक व सार्वजनिक कामासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वसामान्य लोक मंत्रालयात येतात. असे असताना देखील मंत्रालयातील दूषित पाण्यामुळे जुलाब आणि उलट्यांच्या त्रासाने शेकडो कर्मचारी आणि अधिकारी त्रस्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

शुक्रवार(दि.२१) सकाळपासून दुपारपर्यंत १०० पेक्षा जास्त अधिकारी जुलाब आणि उलट्याच्या त्रासाच्या तक्रारी घेऊन मंत्रालयातील शासकीय रुग्णालयात जाताना दिसले. सर्वांना सारखाच त्रास होत असल्याने चौकशी केली असता मंत्रालयातील पिण्याच्या दूषित पाण्यामुळे हा त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले. मंत्रालयात पिण्यासाठी पुरविण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसून त्याला दुर्गंधीयुक्त वास असल्याच्या तक्रारी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या तरीही याकडे दुर्लक्ष केले गेले आणि पाण्याच्या दर्जायमध्ये काहीही फरक न पडल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. दरम्यान दिवसभरात हा त्रास वाढून अनेक अधिकारी आणि कर्मचारी कार्यालय सोडून घरी निघून गेले होते.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ गंभीर दाखल घेतली असून पाण्याचे सॅम्पलही नेले आहेत. हा प्रकार गंभीर असून पाण्याच्या सॅम्पलचे रिपोर्ट आल्यानंतरच नेमका प्रकार समोर येईल असे मंत्रालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.

२ दिवसांपूर्वीच मंत्रालयाच्या उपाहारगृहातील मटकीच्या उसळीत आढळले होते चिकनचे तुकडे:
नुकतेच विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असताना बुधवारी देखील जेवण आणि आरोग्यासंबंधी एक तक्रारिची चर्चा मंत्रालयात होती. मंत्रालयाच्या उपाहारगृहात मागवण्यात आलेल्या मटकीच्या उसळीमध्ये चिकनचे तुकडे आढळल्याची तक्रार मनोज लाखे या सरकारी अधिकाऱ्याने केली होती. यासंबंधीचे वृत्त विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येत होते.

असे असताना मंत्रालयात नेमकं चाललंय काय आणि आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची