मंत्रालयास वर्षानुवर्ष ‘चिकट’लेल्या ७० अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात केली आहे. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर आता मंत्रालयातील बदल्या करण्यात आल्या आहेत. मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पदावर चिटकून आहेत. एकाच जागेवर चिकटून असलेल्या या अधिकाऱ्यांना धक्का देत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बदल्या केल्या आहेत. या सफाई मोहीमेतंर्गत आतापर्यंत ७० अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत.

या अधिकाऱ्यांमध्ये ४४ कक्ष अधिकारी, ११ अवर सचिव आणि १४ उपसचिव व सहसचिवांचा समावेश आहे. हे अधिकारी मागील सात ते आठ वर्षांपासून एकाच जागी असल्यामुळे ते सुस्तावले तसेच वेळेवर काम करत नसल्याची तक्रार देखील आल्याने मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांना सरळ करण्यासाठी त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, एका विभागात सहा वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा देता येत नाही, मात्र हा नियम मोडीत काढत हे अधिकारी मागील आठ वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून होते. त्यामुळे हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येताच त्यांनी या सत्तर आधिकऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

किचनमधील ‘या’ ९ भाज्यांचा ‘व्हायग्रा’सारखाच परिणाम

शुद्ध रक्तपुरवठ्यासाठी (NAT)आधुनिक रक्ततपासणी आवश्यक

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

योग्य काळजी घेतली तर ‘हा’आजार होणार नाही,तुम्ही राहा अलर्ट

Loading...
You might also like