मंत्रालयाच्या तळमजल्यावरील पोलीस नियंत्रण कक्षालाच पावसाचा ‘फटका’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मंत्रालयात मागच्या वर्षी सातव्या मजल्यावर पशुसंवर्धन मंत्र्यांच्या दालनात पावसामुळे लागलेली गळतीची घटना घडली होती. यंदा मात्र मुसळधार पावसामुळे मंत्रालयाच्या तळमजल्यावरील पोलीस नियंत्रण कक्षालाच पावसाचा फटका बसला.

पाणी झिरपल्याने या कक्षाचे सिलिंगच कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे ‘कार्पोरेट लूक’ देण्याचे काम पूर्ण झाले असले तरी त्यात त्रुटी असल्याचे या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे.

मंत्रालयाच्या तळमजल्यावरच पोलीस नियंत्रण कक्ष आहे. या ठिकाणी सामान्य नागरिकांसह पोलिसांचा कायम राबता असतो. याच तळमजल्यावर अचानक हा भाग कोसळल्याने पोलिसांची धावाधाव झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी करून ताबडतोब कोसळलेल्या भागाचा ढीग रिकामा केला. या घटनेबाबत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही काहीही बोलण्यास नकार दिला.मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर २०११ मध्ये नूतनीकरण करण्यात आले होते; पण त्यात त्रुटी असल्याचे सिद्ध झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ