गरजू आणि गरीब मुलांना मदत करत ‘माणूसकी फाउंडेशन’नं साजरा केला ‘रोटी डे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काल (रविवार दि 1 मार्च 2020) गरजू आणि गरीब मुलांना माणूसकी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भवाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांना खाऊ आणि रोटी देऊन रोटी डे साजरा करण्यात आला. यावेळी क्राईम इन्वेस्टीगेशन ब्युरो महाराष्ट्रच्या महिला अध्यक्षा ॲड. उज्वला झेंडे, पुणे जिल्हा ॲड. अलोक झेंडे, रोटरी क्लब मिड इस्टचे नियोजित सेक्रेटरी सुहास चव्हाण, ॲड. श्रुती झेंडे आदी उपस्थित होते .

अनेक गरीब आणि गरजू मुले अशी आहेत ज्यांना पोट भरण्यासाठी रस्त्यावर  सिग्नलला भीक मागावी लागते. कोणी त्यांना पैसे देतं तर कोणी त्यांना काम करण्याचा  किंवा शिक्षण घेण्याचा सल्ला देतं. यातील काही मुले सिग्नलला चौक चौकात फुगे विकणे, सिग्नलला थांबलेल्या गाड्या पुसणे हा मार्ग अवलंबतात. अशा मुलांना समाजानं मदतीचा हात दिला पाहिजे. असाच मदतीचा हात माणूसकी फाऊंडेशननं दिला आहे आणि रोटी डे साजरा केला आहे.