दुष्काळाच्या ‘दाहक’तेचा राज्याच्या तिजोरीलाही फटका, मराठवाड्यातून महसुलात ३ हजार कोटींची घट

औरंगाबाद : वृत्तसंस्था – यंदाच्या दुष्काळाचा फटका राज्याच्या तिजोरीला बसला आहे. मराठवाड्यातून मिळणारा महसुलदेखील कमी झाला असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत त्यात तीन हजार कोटींची घट झाली आहे.

मराठवाड्याने राज्य सरकारची तिजोरी भरण्यात मोठा वाटा उचलत असतो मात्र यंदा दुष्काळामुळे चित्र बदलले आहे. असे असले तरी २0१८-१९ या आर्थिक वर्षात मराठवाड्याने राज्य सरकारला ९,२४७ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवून दिला आहे.

अबकारी शुल्क व सीमाशुल्क कराऐवजी दोन वर्षांपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करण्यात आला आहे. मराठवाड्याने २0१८-१९ या आर्थिक वर्षात जीएसटीच्या रूपाने ३,६५४ कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला. यात केंद्रीय जीएसटीचा वाटा १,११८ कोटी रुपयांचा आहे.

स्कोडा कार कंपनीकडून केंद्र सरकारला सर्वाधिक जीएसटी मिळत असतो. स्कोडाच्या विक्रीत घट झाल्याचा परिणाम केंद्रीय जीएसटीवर झाला. राज्य जीएसटीला १६१६ कोटीचा महसूल मिळाला. एकात्मिक जीएसटीमधून ९२0 कोटी रुपयांचा कर मिळाला. देशाची लिकर राजधानी असणार्‍या औरंगाबाद शहराने राज्य सरकारला उत्पादन शुल्क कराच्या माध्यमातून यंदा ४,३१0 कोटी रुपयांची कमाई करून दिली आहे. याशिवाय विविध सेसच्या माध्यमातून ५४९ कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला.

मराठवाड्यात २0१५-१६ या वर्षात चांगला पाऊस झाला. परिणामी, केंद्र व राज्य सरकारला या वर्षी १२,९00 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदाचा दुष्काळ सर्वात दाहक असल्याने २0११-१२ या वर्षापेक्षाही कमी महसूल जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
पचनप्रणाली बिघडल्यास होऊ शकतो यकृतावर परिणाम
जंक फूड महिलांच्या आरोग्यासाठी घातक
तुमच्या मनातही आहेत का ? रक्तदानाविषयी हे ‘गैरसमज’

Loading...
You might also like