लग्नादरम्यान घडले ‘असे’ काही ; भर मंडपातून नवरदेवासह वऱ्हाडी ‘गायब’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वधू पित्याने लग्नाला बोलावलेल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकाबाबत आक्षेप घेऊन भर मंडपातून वर व वऱ्हाडी निघून जाण्याचा प्रकार आळंदी येथे शुक्रवारी दुपारी घडला. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी वरासह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर विकल ईश्वरसिंग कचवाय, त्याची बहिण विद्या अजित गौड, मेव्हणे अजित गौड व काका प्रदीप पुजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राकेश अर्जुन परमाळ (वय ४०, रा, न्यू म्हाडा कॉलनी, कुळगाव बदलापूर, पूर्व) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, राकेश परमाळ यांची मुलगी रितू हिचा विकल कचवाय याच्याबरोबर विवाह ठरला होता. आळंदीमधील साई मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२.४५ च्या मुहूर्तावर हा विवाह होणार होता. सर्व तयारी झाली असताना रितू व त्याच्या नातेवाईकांनी राकेश परमाळ यांचे जवळचे नातेवाईक सोनूलाल परमाळ व राजू शंकर चव्हाण यांना लग्नाला का बोलावले, असा बहाणा करुन राकेश यांना शिवीगाळ व दमदाटी करुन हाताने मारहाण केली. त्यानंतर ते लग्न न करता मंगल कार्यालयातून निघून गेले. यामुळे राकेश यांच्या मुलीचा विवाह मोडला. तसेच त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फसवणूकीची फिर्याद दिली आहे.