महायुतीचे उमेदवार बारणे, आ. जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेच्या निवडणूकीतला राज्यात आज चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघात मतदान होत आहे. लक्षवेधी मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार बारणे व आमदार जगताप यांनी आपला मतदानाचा हक्क बजवला आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी यावेळी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर आमदार लक्ष्मण जगताप यांनी मोदी यांची लाट अजून असल्याने महायुतीचाच उमेदवार विजयी होईल आणि देशात पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, मावळ लोकसभा संघात मतदानाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. ठिकठीकाणी मतदानासाठी गर्दीमुळे उत्साहाचे वातावरण आहे.