उद्या होणाऱ्या मतदानाचे पिंपरी-चिंचवड शहरात ४२ संवेदनशील बुथ

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – चौथ्या टप्यात उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचे नव्याने कार्यान्वित झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गंत ४१ बुथ संवेदनशील (गंभीर) आहेत. या बुथवर अतिरिक्त लक्ष केंद्रीत केले गेले असून प्रत्येक बुथवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

मावळ आणि शिरूर या दोन मतदारसंघासाठी २९ एप्रिलला मतदान होत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड व मावळ मधील दोन पोलिस ठाण्यांच्या अखत्यारित असलेल्या परिसरासह शिरूर लोकसभेतील भोसरी विधानसभा मतदारसंघातील दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संवेदनशील केंद्रे आहेत. संवेदनशील असलेल्या बूथवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून, पोलिसांसह निवडणूक आयोगाकडून या भागावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त बंदोबस्तातील पोलिस कर्मचारी-होमगार्ड यांची या केंद्रांवर नियुक्ती करण्यात आले आहेत.

एकूण केंद्र ३६५ असून १६७१ बूथ आहेत. पैकी ४१ बुथ संवेदनशील असून ते ३२ केंद्रात (इमारतीत) आहेत. यामध्ये पिंपरी पोलिस स्टेशन १० केंद्र १३ बूथ, चिंचवड पोलिस स्टेशन १ केंद्र २ बूथ, भोसरी पोलिस स्टेशन ७ केंद्र १० बूथ, भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशन १ केंद्र १ बूथ, निगडी पोलिस स्टेशन २ केंद्र ३ बूथ, वाकड पोलिस स्टेशन १ केंद्र १ बूथ, सांगवी पोलिस स्टेशन ६ केंद्र ७ बूथ, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन ३ केंद्र ३ बूथ, तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन १ केंद्र १ बूथचा समावेश आहे. या बुथवर आवश्यकतेनुसार व्हिडीओ शुटींग करण्यात येणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like