मिलिंद सोमणची सासू आहे त्याच्यापेक्षा वयाने लहान, या दोघांच्या प्रेमप्रकरणावर घरातल्यांची अशी होती प्रतिक्रिया

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – फिटनेस फ्रिक, मॉडेल आणि अ‍ॅक्टर मिलिंद सोमण यांनी गेल्या वर्षी गर्लफ्रेंड सोबत लग्नाची गाठ बांधली. याची चर्चा सोशल मिडियावर खुप व्हायरल झाली होती. कारण अंकीता ही अभिनेता मिलिंद यांच्यापेक्षा खुप लहान आहे. तरीदेखील त्या दोघांनी लग्न केले.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अंकीता म्हणाली की, माझी आई आणि मिलिंद यांच्यामध्ये फक्त दोन वर्षाचा अंतर आहे. माझ्या आईला मिलिंदची पर्सनॅलिटी प्रचंड आवडत होती. पण आमच्या नात्याबद्दल थोडी घाबरलेली होती. सुरुवातीला माझ्या घरच्यांना आमच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळाले तेव्हा त्यांना खुप धक्का बसला होता. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल गंभीर आहात का ? असे देखील विचारले. माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे आणि मला आयुष्य त्याच्यासोबत व्यतीत करायचे आहे. मी त्याच्यासोबत लग्न करेन अथवा नाही करणार. पण मी त्याच्यासोबत राहणार असे मी ठामपणे घरी सांगितले. त्यावर माझा विचार कधीतरी बदलेल, असे माझ्या पालकांना वाटले होते.

मुलाखतीत अभिनेता मिलिंद यांनी सांगितले की, अंकिताच्या घरात जेव्हा आमच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळाले तेव्हा खुप विरोध झाला. एवढेच नव्हे तर माझी सासु माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. गेल्यावर्षी २२ एप्रिलला थाटामाटात अलिबागमध्ये लग्न केले. अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी असून २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते.