आमदार महेश लांडगेंसाठी आजचा दिवस ‘दुग्धशर्करा’ योग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासाठी आजचा दिवस दुग्धशर्करा योग मानला जात आहे. आपल्या वाढदिवशीच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आज (बुधवारी) आमदारकीची शपथ घेतली आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा महेश लांडगे आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी तब्बल 80 हजारांच्या मताधिक्याने लांडगे निवडून आले आहेत. 24 ऑक्टोबर रोजी लांडगे आमदार म्हणून निवडून आले. परंतु, सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे आमदारांचा शपथविधी झाला नव्हता. निवडून येऊन देखील आमदारांना अधिकार प्राप्त झाले नव्हते.

त्यानंतर आज राज्यातील आमदारांचा शपथविधी पार पडला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या वाढदिवशीच आमदारकीची शपथ घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like