जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी आ. मोहन फड यांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन (शेख सिकंदर) – जमिनीतील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने बोअरवेल, विहिरी, बंधारे, या उपलब्ध असलेल्या पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्याअभावी बागायती पिके धोक्यात आली आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाण्याचे डाव्या आणि उजव्या कालव्यात एक पाणी आवर्तन सोडावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे भेट घेऊन आ.मोहन फड यांनी केली आहे.

जिल्ह्यातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई मार्चपासून भासत आहे. शेतकऱ्यांना गुरेढोरे व शेतातील बागायती पिकांना जोपासणे अवघड होत आहे. पाण्या अभावी बागायती पिके जमिनीवर मान टाकत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी आ.मोहन फड यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेत निवेदन देऊन केली आहे.