आ. राहुल कुल यांची पूरग्रस्त भागाला भेट, पुरबाधित नागरिकांना सर्वोतोपरी मदत करण्याची ‘ग्वाही’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – खडकवासला धरणसाखळी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या पावसाने खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू असल्याने मुळा, मुठा व भीमा नदीला पूर आला आहे.

दौंड शहरातील इंदिरानगर, भीमनगर, खाटीक गल्ली, मंडई, वडार गल्ली, पानसरे वस्ती, बेथल कॉलनी, खाटीक गल्ली, अण्णाभाऊ साठेनगर आदी भागात पुराचे पाणी पोहचले आहे. दौंड नगरपालिका प्रशासनाद्वारे पुराने बाधित नागरिकांना नगरपालिका हॉल व ज्युनिअर लायब्ररी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या स्थितीची पाहणी करण्यासाठी आणि पूरग्रस्त बाधित कुटुंबांना तातडीने मदत करण्याकरिता दौंड आमदार राहुल कुल यांनी शहरातील पुरग्रस्त भागाला तातडीने भेट दिली व पुराने बाधित स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधी प्रशासनाला सूचना दिल्या.

गेल्या काही दिवसांपासून धरणावर होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला असून पूर परिस्थिमध्ये अडकलेल्या नागरिकांची सर्वोतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन यावेळी आ.राहुल कुल यांनी बोलताना दिले.

यावेळी दौंडचे माजी नगराध्यक्ष व जेष्ठ नेते प्रेमसुख कटारिया, नगराध्यक्षा सौ.शितल कटारिया, गटनेते राजेश गायकवाड, नागरिक हित संरक्षण मंडळ, रासप आरपीआय आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –