आमदार साहेब कुरकुंभ MIDC मध्ये येऊ नका !

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील १४ ऑगस्टची ती रात्र ज्या रात्री कुरकुंभ एमयडीसीमध्ये असणाऱ्या अल्कली अमाईन्स या केमिकल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागली होती सुमारे १० किमीवरून हि आग आणि याचा धूर सहज दिसत होता. संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोक जीव वाचविण्यासाठी मिळेल त्या वाहनाने कुरकुंभ परिसर सोडून जात होते. कुरकुंभ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अफवा पसरत होत्या संपूर्ण एमआयडीसी उडणार आहे ! गाव बेचिराख होणार आहे ! पळा, गाव सोडा चला लवकर असे संदेश लोक एकमेकांना देत होते. त्यावेळी एका पत्रकाराने आमदार राहुल कुल यांना फोनवरून याची माहिती दिली त्यावेळी आमदार आपला दिवसभराचा तालुक्याचा दौरा उरकून नुकतेच आपल्या राहू येथील निवासस्थानी पोहोचत होते. यावेळी त्यांनी मी तिकडेच निघालो आहे व संबंधित खात्यांना सूचना दिल्या असून आग विझविण्याचे काम सुरू असल्याचे पत्रकारास सांगितले.

आगीचे रौद्ररूप पाहता पत्रकारांनी दादा तुम्ही कुरकुंभ एम.आय.डी.सीमध्ये येऊ नका आग मोठी आहे, रस्ता बंद करण्यात आला आहे, लोक गाव सोडून पळत आहेत, परिस्थिती बिकट आहे असा सल्ला देत फोन ठेवला. काहीवेळाने आमदार राहुल कुल हे एमयडीसी परिसरामध्ये दाखल झाले असल्याची माहिती मिळाली. तो पर्यंत भडकलेली आगही आटोक्यात आणण्यात यश येत होते. कंपनीमध्ये लागलेली आग ज्यावेळी आतमध्ये धुमसत होती, संपूर्ण परिसरातील लोक आपले घर, आपले गाव सोडून निघून गेले होते त्यावेळी कंपणीपुढे फक्त कुरकुंभ गावातील काही युवकांचा जमाव, कंपनीचे कर्मचारी, दौंडचे पोलीस अधिकारी, काही पत्रकार आणि दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल हे दौंड च्या राजकीय पटलावरील एकमेव नेते तेथे तब्बल साडे तीन तास गेटसमोर उपस्थित असल्याचे चित्र पहायला मिळत होते.

आगीवर नियंत्रण आल्यानंतर आमदार कुल यांसोबत काही पत्रकार, पोलीस आणि कंपनी कर्मचारी आग लागली त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत होते त्यावेळी आगीने पेटलेले पदार्थ अजूनही धुमसत असल्याचे जाणवत होते. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कुणी कितीही बढाया मारत असले तरी ज्यावेळी खरोखरच अशी आणीबाणीची वेळ येते त्यावेळी अश्या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून जो तेथे जाऊन भक्कमपणे उभा ठाकतो तोच खरा हिरो समजला जातो आणि त्या दिवशी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांना दिलासा देणारे आणि चिघळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणारे आमदार राहुल कुल हे त्या दिवशी आपल्या कार्य आणि तत्परतेने हिरो ठरले होते, म्हणतात ना…
“न कद बड़ा.. न पद बड़ा ।
मुसीबत में जो साथ खड़ा …
वो सबसे बड़ा” ।

आरोग्यविषयक वृत्त –