कुरकुंभ MIDC : अधिकाऱ्यांनी कागदावर काम दाखवण्यापेक्षा जागेवर जाऊन पाहणी करावी : आ. राहुल कुल

दौंड : पोलीसनामा ऑलाइन (अब्बास शेख) – अधिकाऱ्यांनी कागदावर काम दाखवण्यापेक्षा प्रत्यक्षात कुरकुंभ एमआयडीसी मध्ये जागेवर जाऊन पाहणी करावी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच सुरक्षा संबंधी विविध उपाय योजनांसंबंधी कार्यवाही करावी अशी सूचना दौंड चे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत केली. या बैठकीला जिल्हाधिकारी मा.नवल किशोर राम, खासदार सुप्रिया सुळे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा.संदीप पाटील, एमआयडीसी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच कुरकुंभ व पांढरेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी कुरकुंभ एमआयडीसी मधील काही उद्योगांद्वारे नियमांची पायमल्ली करून होत असलेल्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली.

दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मधील अल्कली अमाईन्स या कंपनीमध्ये बुधवार दि. १४ रोजी झालेल्या स्फोट व आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती आमदार राहुल कुल यांनी मा.जिल्हाधिकारी साहेबांना केली होती. त्यानुसार काल ही बैठक पार पडली. कुरकुंभ एमआयडीसी मधील काही उद्योगांद्वारे नियमांची पायमल्ली करून होत असलेल्या प्रदूषणा बाबत आ.कुल यांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता तसेच नोव्हेंबर २०१७ व जुलै २०१८ मध्ये दोन बैठका घेऊन आवश्यक सूचना केल्या होत्या त्याची अंमलबजावणी त्वरित व्हाही अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी येथील कंपन्या व त्यांची सुरक्षितता याबाबत ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दिले.

आरोग्यविषयक वृत्त –