बारामती लोकसभेच्या उमेदवार थापतायत ‘भाकरी’ तर माजी आमदार बनवतायत ‘कालवण’ !

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – सुभाष बाबुराव कुल हे नाव दौंड तालुक्यातील जनताच काय राज्यातील कोणत्याही नेत्याला माहीत नसेल असा राजकीय नेता शोधून सापडणार नाही. या नावात आणि या परिवारामध्ये नेमकं असं काय आहे की हा परिवार कायम लोकांच्या लक्षात राहतो याचे उत्तर हे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतून समोर आले आहे.

तर घडलं असं की दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल गावांचा दौरा करत तालुक्यात फिरत होते रात्री आठच्या सुमारास एका गावामध्ये ते कार्यक्रमासाठी येणार म्हणून काही कार्यकर्ते आणि कार्यक्रमाचे आयोजक त्यांची वाट पाहत थांबले होते. साधारण सव्वा आठच्या सुमारास आमदार कुल हे त्या गावामध्ये आले कार्यक्रमस्थळी भेट दिली आणि ते निघायला लागले तेवढ्यात दोन-तीन ग्रामस्थ आणि एक कार्यकर्ता काही कामाबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुढे सरसावले. वेळ कमी असल्याने आमदारांनी त्यांना थेट गाडीत बसा म्हणजे निवांत चर्चा करता येईल असे सुचवले आणि ग्रामस्थ गाडीत बसले. गाडी थेट एका दहीहंडीच्या कार्यक्रमस्थळी गेली. तो पर्यंत रात्रीचे साधारण साडेदहा वाजले होते कार्यक्रम उरकला आणि पुन्हा गाडी सुरू झाली आणि चर्चाही..

गाडी थेट राहू बंगल्यावर पोहोचली आमदारांबरोबर चार-पाच ग्रामस्थही बंगल्यात शिरले तेवढ्यात त्यांची आतुरतेने वाट पाहणारी त्यांची छकुली मायरा ही ने दरवाज्याच्या आडून “भो” केले. त्यावेळी बारामती लोकसभेला भाजपकडून उभ्या आलेल्या उमेदवार कांचन कुल, माजी आमदार रंजनाताई कुल या दरवाजमध्ये उभ्या होत्या. तो पर्यंत रात्रीच्या साडे अकरा वाजून गेल्या होत्या. पुन्हा काही नागरिक आपल्या गावांतील विकास कामानिमित्त आमदारांच्या बंगल्यावर दाखल झाले आणि पुन्हा चर्चेला सुरुवात झाली. चर्चेतून अचानक आ.राहुल कुल उठले आणि त्यांनी किचनरूम जवळ जात आम्ही चार-पाच जण ‛जेवणार आहोत ग’ असे सांगून पुन्हा चर्चेत सहभागी झाले. (गाडीत त्यांच्या सोबत चर्चा करत आलेल्या त्या ग्रामस्थांच्या भुकेचा त्यांनी अंदाज लावला असावा) त्यावेळी कामगार तर घरी गेले होते मग जेवन कोण बनवत असेल असे एका कार्यकर्त्याच्या लक्षात आले.

साधारण बारा वाजता विकास कामा संदर्भात आलेले कार्यकर्ते चहा घेऊन जाऊ लागले त्यावेळी त्या गडबडीत गाडीत बसून आलेल्या एका कार्यकर्त्याने सहज किचनरुम मध्ये डोकावले आणि त्याला धक्काच बसला, त्याच्या डोळ्यांवर त्याला विश्वासच बसेनासा झाला. समोर पाहतो तर काय… रात्रीच्या बारा वाजता त्या ग्रामस्थांसाठी बारामती लोकसभेला भाजपकडून उभे राहिलेल्या उमेदवार कांचनताई कुल भाकरी थापत होत्या आणि दौंडच्या दोन वेळा आमदार राहिलेल्या माजी आमदार रंजनाताई कुल या कालवण बनवत होत्या.. हे दृश्य पाहून तो कार्यकर्ता तर हबकलाच पण त्याने ज्यावेळी ही गोष्ट त्या दोन-तीन जणांना सांगितली त्यावेळी तेही अवाक झाले.

रात्री बारानंतर आपण घरी आल्यानंतर आपली बायकोही घाई घाई आपल्याला बनवून ठेवलेले जेवण वाढत नाही, तर आता हातानेच घ्या, खा, आणि झोपा असा फर्मान सोडते मात्र हे कुटुंब म्हणजे खूप वेगळेच आहे राव असे न रहावल्याने त्यातील एक ग्रामस्थ बोलून गेला. तर एकाने बाप-लेकीच्या प्रेमाचा फोटो आपल्या कॅमेऱ्यात जतन करून घेतला.

वरील घडलेली घटना ही कधीतरी सर्व सामान्य कुटुंबामध्ये घडू शकते मात्र आमदार, खासदारांच्या घरामध्ये या घटना घडणे दुर्लभच म्हणावे लागेल. त्यामुळे कुल कुटुंब हे लोकांच्या किती जवळ आहे, आणि ते आजही स्वतःला सर्वसामान्यच कसे मानतात हे न सांगताही अनेकांना दिसून आले. हे कुटुंब पदाने कितीही मोठे झाले तरी मनाने मात्र ते आजही सर्वसामान्य जनतेच्याच सोबत असल्याचे या घटनेवरून सर्वांना जाणवले.

दौंडचे माजी आमदार सुभाष कुल असोत की सुभाष अण्णांचे वडील आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांचे आजोबा बाबुराव कुल असोत त्यांनीही त्यांच्या काळामध्ये कामानिमित्त रात्री-अपरात्री अचानक घरी आलेल्या नागरिकांना कधी जेवनाशिवाय जाऊ दिले नव्हते आणि तीच परंपरा आता त्यांचे पुत्र आमदार राहुल कुल हेही जपत असल्याने त्यांच्या प्रति लोकांचा ओढा आणि प्रेम का आहे हे लक्षात येत असून फक्त साधे राहणीमानाचा देखावा करून जमत नाही तर ते आचरणातही असावे लागते आणि त्याला परंपरेची जोड ही असावी लागते असा एक ग्रामस्थ शेवटी बाहेर पडताना बोलून गेलाच.

आरोग्यविषयक वृत्त –