Homeताज्या बातम्यासवतीसाठी नवरा मारणाऱ्यांच्या बुद्धीची दया येते : आ. राहुल कुल

सवतीसाठी नवरा मारणाऱ्यांच्या बुद्धीची दया येते : आ. राहुल कुल

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – ज्या पक्षाची देशात, राज्यात सत्ता होती त्याच पक्षाचा आमदार असताना दौंड – पुरंदरसाठी मंजूर झालेले प्रांत कार्यालय हे पुण्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला त्याला आम्ही विरोध करण्यासाठी न्यायालयात गेलो म्हणून ते कार्यालय दौंड किंवा पुरंदर तालुक्यामध्ये व्हावे असा निर्णय झाला असताना केवळ आम्ही न्यायालयात गेलो आणि हा निर्णय झाला आणि ते प्रांत कार्यालय दौंडमध्ये झाले. तर त्याचे श्रेय आम्हाला मिळेल असा विचार करून त्यावेळी सत्तेत असणाऱ्या या मंडळींनी केवळ ‛सवतीसाठी नवरा मारायचा’ कार्यक्रम केला आणि त्यांनी ते प्रांत कार्यालय पुरंदरला विरोधी पक्षाचा आमदार असतानाही सासवडला नेले.  आताही हीच मंडळी शासनाकडून आलेल्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहचवत असताना आणि त्याचा लाभ हा गोरगरीब आणि गरजवंतांना होणार असताना केवळ या योजनेंकडे राजकीय हेतूने प्रेरित होऊन या योजनाच फसव्या आहेत असे म्हणत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यांच्या बुद्धीची कीव येते अशी टिका दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी माजी आमदार रमेश थोरात यांचे नाव न घेता केली.

ते दौंड तालूक्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी पाणी ही खूप मोठी गरज असून तालुक्याला पाणी नको असे म्हणणारे हे एकमेव महाभाग आहेत. आमच्या या पाच वर्षांच्या काळामध्ये प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे. आरोग्य निधीच्या माध्यमातून जनतेला याचा मोठा फायदा झाला असून त्याचा खूप आनंद वाटत आहे. पुढील पाच वर्षांमध्ये अन्य तालुक्यांपेक्षा आपला दौंड तालुका खूप पुढे असेल याची ग्वाही देतो असे म्हणत लवकरच दौंडला प्रांत कार्यालय होणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News