विजयोत्सवाच्या धामधुमीतही आमदार राहुल कुल यांची रुग्ण सेवा

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – राज्यात विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर एका दिवसाच्या जल्लोशानंतर बहुतांश नवीन आमदार विश्रांती घेत आपले फोन नॉट रिचेबल करून अनेक आमदार गायब झाले आहेत मात्र दौंड विधानसभा निवडणूक मतदान संपताच राहुल कुल यांनी दौंड च्या भवितव्याचा विचार करून आपल्या कामास सुरवात केली आहे. मतदान संपल्यानंतर त्यांनी डिजिटल व अद्यावत नवीन माहिती संकलित करण्यास दोन दिवस वेळ दिला होता त्यानंतर निकाल लागताच त्यांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

निकाल लागल्यानंतर शुभेच्छा अभिनंदन असे विजयी वातावरण असताना केडगाव येथील एक कार्यकर्ता रविवारी दादांना सांगू लागला की केडगाव मधील एका रूग्णला जहांगीर हॉस्पिटल मध्ये मदतीची गरज आहे एवढ्या गर्दीत आ. राहुल कुल यांनी लागलीच संबंधित हॉस्पिटलमध्ये फोन करून मदत करण्यास सांगितले यावरून कुल यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

पुढील काळात जेष्ठ नेते व तरुण कार्यकर्ते यांची मजबूत फळी तयार करण्याची सुरुवात राहुल कुल यांनी आता पासुनच केल्याचे दिसत आहे. सर्वांची मेहनत व ज्या गरीब व गरजू रुग्णांना मी मदतीचा हात दिला त्यांच्या आशिर्वाद वर आपण नी निवडणूक जिकल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले व पुढील काळात देखील रुग्ण सेवा सुरू राहणार असल्याचे म्हणाले.

Visit : Policenama.com