30 वर्षात माजी मंत्र्यांना जमलं नाही, पण आ.संदिप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यानं यश

नागपूर अधिवेशन, जिल्हा आढवा बैठकीत बीड, चौसाळा रस्ता प्रश्नी उठवला होता आवाज

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत राहिलेल्या माजी मंत्र्यांना बीडचा विकास करता आलेला नाही. आता आ. संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने प्रलंबित व नव्याने विकास कामे मार्गी लागत आहेत. येडशी-औरंगाबाद महामार्गावर बीडला बायपास झाल्याने शहराजवळील रामनगर ते जालना रोड -छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा-बार्शी नाका-कोल्हारवाडी पर्यंतचा १२ कि.मी रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. सदर रस्त्याचा प्रश्न खा. सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आ. संदीप क्षीरसागर यांनी पाठपुरावा केल्याने लवकरच शरतील १२ कि.मी व चौसाळा येथील रस्तासाठी १०० कोटीच्या प्रस्तावित पैकी ३४ कोटींच्या आराखडात आवश्यक बदल करून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. याबाबत आ. संदीप क्षीरसागर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात, जिल्हा आढावा बैठकीत आवाज उठवला होता.

बीड शहरातून येडशी – औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग 52 (जुना NH211) जातो. हा रस्ता बायपास करून वळवण्यात आलेला आहे. असाच बायपास रस्ता चौसळा येथून करण्यात आलेला आहे. बीड व चौसाळा शहरातील रस्ता खूप खराब झालेला असून या कडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झालेले आहे. त्याच बरोबर बीड बायपासला इमामपूर व आदी ठिकाणी सर्व्हिस रोड, मुख्य जोड रस्ता नसल्याने वाहतुकदार, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणत हाल होत आहेत. याकडे आ.संदीप क्षीरसागर यांनी लक्ष घालत रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन, त्याचा खा. सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याने लवकरच सदर रस्त्याचे काम सुरू होणार आहे.

रस्तेकामाबरोबरच होणार सुशोभीकरण
शहरातील १२ कि. मी. व चौसाळा येथील रस्ते महामार्गाकडुन होणार आहे. या रस्त्यांचे चौपदरीकरण होत असताना शहरात गटारी, सौरपथ दिवे, झाडे, वीज पुरवठा आदि बाबींचा समावेश करून या रस्त्यावर सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –