गोरगरीबांची दिवाळी गोड करा, वाडी-वस्तीवर रेशन धान्य पोहोचवा, आ. संदीप क्षीरसागरांच्या तहसिल प्रशासनाला सुचना

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीचा सण दोन दिवसावर आहे, शहरी आणि ग्रामीण भागातील गोरगरीबांची दिवाळी गोड झाली पाहिजे. त्यांच्यापर्यंत रेशनचे सर्व धान्य पोहचले पाहिजे, ज्या वाडी, वस्ती, तांड्यावर व शहरी भागात रेशनचा माल गेला नाही त्या ठिकाणी तात्काळ रेशनच्या धान्य वाटपाचे काम सुरू करा. कोणीच वंचित राहता कामा नये, गोरगरीबांना हक्काचे धान्य मिळाले पाहिजे. त्यात कसलाही हलगर्जीपणा चालणार अशा सूचना आ. संदिप क्षीरसागर यांनी तहसिल प्रशासनाला दिल्या आहेत.

विजयाचा गुलाल घेवून संदिप क्षीरसागर बीडकरांच्या समस्या सोडवण्यासाठी कामाला लागले आहेत.
बीड विधानसभेच्या निवडणूकीत संदीप क्षीरसागर विजयी झाल्यानंतर बीड शहरातील आणि ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या, प्रश्‍न सोडवण्यासाठी लगेच कामाला लागले आहेत. विजयाचा गुलाल अंगावर घेत गोरगरीबांची दिवाळी गोड झाली पाहिजे, त्यांना रेशनचे धान्य मिळाले पाहिजे. गहु, तांदूळ, साखर, दाळ व इतर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर लगेच त्यांनी बीडचे तहसीलदार आंबेकर यांच्याशी संपर्क साधत गोरगरीबांची दिवाळी गोड करा, ज्या भागात रेशनचा माल वाटप झाला नाही तेथे तात्काळ रेशनवरील धान्याचे वाटप करा, सर्व आलेलं धान्य गोरगरीबांपर्यंत गेलं पाहिजे. यात कसल्याही प्रकारची तडजोड मला चालणार नाही.

सर्वसामान्य माणसाची कामे केंद्रबिंदू मानून काम करायचं आहे. प्रशासनानेही गोरगरीबांची कामे तातडीने करावीत याबाबत लवकरच आपण बैठक घेवू आणि ठोस उपाय योजना कशा करता येतील प्रयत्न करत असतांना शहरी आणि ग्रामीण भागातील मुुलभूत प्रश्‍न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करायचे आहेत अशा प्रतिक्रियाही आ.संदीप क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.

Visit : Policenama.com