home page top 1

पक्ष निश्चित नाही, तरीही आ. जगतापांची विधानसभेची तयारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार संग्राम जगताप नेमक्या कोणत्या पक्षात जाणार, याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र निवडणूक लढविण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्ष ठरला नसला, तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी विधानसभेचा प्रचार चालू केला आहे.

नगरसेवकांचे पाच-पाच याप्रमाणे गट तयार करून शहराच्या विविध भागात हे नगरसेवक नागरिकांना जाऊन भेटत आहेत. आ. संग्राम जगताप यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र पक्ष अजून ठरलेला नसल्याने अनेक नागरिकांनी जगताप यांच्या पक्षाबद्दल नगरसेवकांना प्रश्न केले आहेत. पक्ष कोणताही असला, तरी उमेदवार म्हणून आ. संग्राम जगताप हाच आमचा पक्ष आहे. आम्ही त्यांच्यासाठी प्रचार करत असल्याचे नगरसेवक सांगत आहेत. या प्रचारात कोणता पक्ष चांगले ठरेल, याची मतेही नागरिकांकडून आजमावून घेताना नगरसेवक विसरत नाहीत.

आ. संग्राम जगताप हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. परंतु त्यांना शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध असल्याने प्रवेशाची प्रक्रिया रखडली आहे. शिवसेनेने प्रवेश दिला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. तिसऱ्या पर्यायाचाही त्यांच्याकडून अवलंब केला जाऊ शकतो.

आरोग्यविषयक वृत्त –

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी

नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर

Loading...
You might also like