कार्यकर्त्यांची ‘हुल्लडबाजी’ अन् पक्षांतर्गत विरोधकांमुळं आ. जगतापांच्या ‘डोकुदुखी’त वाढ ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत विरोधक व कार्यकर्ते आमदार संग्राम जगताप यांची चांगलीच डोकेदुखी ठरू लागले आहेत. हुल्लड कार्यकर्त्यांमुळेच माजी महापौर अभिषेक कळमकर व राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे त्यांच्यापासून दुरावले आहेत. पोलिस अधिक्षक कार्यालयावर हल्लाही हुल्लड कार्यकर्त्यांमुळेच झाला आहे. कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याने त्याचा मोठा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसणार आहे.

आमदार संग्राम जगताप यांचे हुल्लड कार्यकर्ते त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या डोकेदुखी ठरू लागले आहेत. त्यामुळेच पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड प्रकरणात अनेक आ. जगताप समर्थकांना तुरुंगाची हवा खावी लागली. आताही हुल्लड कार्यकर्त्यांमुळे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना धक्काबुक्की, मारहाण झाली. त्यांनी समझोत्याची भूमिका घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला नसला, तरी त्यांची नाराजी कायम आहे. कळमकर कुटुंबीय असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रीय झालेले नाही. त्यांची नाराजी ही हुल्लड कार्यकर्त्यांमुळेच जगताप यांच्यावर ओढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे हेही हुल्लड कार्यकर्त्यांमुळे जगताप यांच्यापासून दुरावले आहेत. कळमकर व किरण काळे यांची नाराजी जगताप यांची डोकेदुखी ठरत आहे.

हुल्लड कार्यकर्त्यांमुळे आमदार जगताप यांचे जनमानसात प्रतिमेवरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे त्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत त्यांना अबसू शकतो. कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी व पक्षांतर्गत विरोधक हे जगताप यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरणार आहेत. त्यामुळे आमदार संग्राम जगताप हे अस्वस्थ आहेत. शहरातील अनेक गुन्हेगारी रेकॉर्डवरील कार्यकर्ते हे जगताप यांचे कार्यकर्ते आहेत. त्याचाही परिणाम त्यांना चांगलाच बसू शकतो.

Visit : Policenama.com