आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देऊ नका !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राहुरी विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी अहमदनगर मधील समाजसेवक शंकर राऊत, मिलिंद मोभरकर आणि अमोल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील निर्ढावलेला गुन्हेगार, कायद्याला कास्पटासमान समजणाऱ्या आमदार शिवाजी कर्डिले यांना पाठीशी घालण्याचे काम सोडून द्यावे. तसेच आगामी निवडणुकीत त्यांना भाजपाने तिकीट देऊ नये अशी मागणी नगर मधील समजासेवकांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची महाजनादेश यात्रा 13 आणि 14 सप्टेंबर रोजी नगर जिल्ह्यात येत असून राहुरी येथे मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन मिलिंद मोभरकर आणि अमोल जाधव शंकर राऊत यांनी ही मागणी केली आहे.

कर्डिले यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही ते पक्षाचे आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी न्यायव्यवस्थेवर दबाव टाकून आपला आमदार कसा निर्दोष सुटेल याची काळजी घेतल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. जर राहुरी मतदार संघातून कर्डिले यांना उमेदवारी दिली गेली तर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेला मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला.

आरोग्यनामा ऑनलाइन –

You might also like